Wednesday, October 20, 2010

मैत्री असते कशी

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?हो हो लोणच्यासारखी।

मुरत जाते, जुनी झाली की।

मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?हो हो सायीसारखी।

घट्ट होते वेळ जा‌ईल तशी।

मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?हो हो बासुंदीसारखी,

गोडी वाढते आटवाल तशी।

मैत्री असते कशी, फोडणीसारखी?हो हो फोडणीसारखी।

लज्जत येते जीवनाला तडतडली तरी।

मैत्री असते कशी, मीठासारखी?हो हो मीठासारखी। नसेल तर हो‌ईल जीवन अळणी....

स्रोत - आर्कुट

1 comments:

sachin patil said...

मैत्री फ़ुला सारखी असते...!
मैत्री गुलाबा सारखी असते
मैत्री आकाशा एवढी असते..!
मैत्री सर्व काही असते अन सर्व काही शिकवते..
मैत्रीत काय असते?
प्रेम..जिव्हाळा ...आपुलकी आणि सर्व काही असते..
मैत्री ही अमर असते..
मैत्री नभातल्या सुर्यासारखी असते..